सहर्ष स्वागत

सविता बोरसे यांच्या शैक्षणिक उपक्रमशील ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे.

सामान्यज्ञान...........भूरूपे

                                                     ⧭⧭⧭⧭⧭⧭⧭ भूरूपे  ⧭⧭⧭⧭⧭⧭⧭ 

१) मैदान म्हणजे काय ?

_ नैसर्गिक सपाट जमिनीस मैदान म्हणतात .

२)टेकडी म्हणजे काय ?

_ जमिनीवरील उंचवट्याचा भाग म्हणजे टेकडी होय .

३)पठार म्हणजे काय ?

_उंचीवरील सपाट प्रदेश म्हणजे पठार होय .

४) डोंगर म्हणजे काय ?

_ उंच टेकडीला डोंगर म्हणतात .

५) दरी म्हणजे काय ?

_ डोंगरावरील खूप खोळ व लांबट भागास दरी म्हणतात .

६ ) खिंड म्हणजे काय ?

_ दोन डोंगरातील अथवा पर्वतातील खोलगट अरुंद भागास खिंड म्हणतात .

७) घाट म्हणजे काय ?

_डोंगराळ अथवा पर्वताच्या भागात वळणावळणाचा जो रस्ता असतो ,त्यास घाट म्हणतात .

८)पर्वत म्हणजे काय ?

_ उंच डोंगराला पर्वत म्हणतात.

९) शिखर म्हणजे काय ?

_पर्वताचे निमुळते टोक म्हणजे शिखर होय .

No comments:

Post a Comment