नमस्कार!
मी सविता बोरसे - उपशिक्षिका म. न. पा. शाळा क्र. ७१ आनंदवली. खरे तर MSCIT होऊनही मला संगणकाचे कुठलेच ज्ञान नव्हते. परंतु शालेय माहिती online भरायचे फर्मान शासनाने जारी केले. मनात खूप भीती असूनही ऑनलाईन काम करायचे ही जिद्द मनाशी धरली. या कामी मला माझे पती अनिल आहेर व माझे दोन पिल्लू समृद्धी व यश यांनी मोलाची साथ दिली.
कामाची सुरुवात मी, माझी मैत्रीण अनिता शिराळे आम्ही दोघांनी शिकायचे ठरवले वकामाला सुरुवात केली. बघता बघता सर्व काम जमू लागले. माझ्यातील गुण हेरून मला पुढे जाण्यासाठी आमच्या मॅडम सौ. कल्पना पाटील यांनी पूर्ण प्रोत्साहन दिले. २०१५-१६ मध्ये केंद्र क्र. १४ व २४ चे पातळीवर काम करणारी मी एकमेव महिला शिक्षिका होती. नंतर राज्य स्तरावर तंत्रस्नेही प्रशिक्षणासाठी माझी नाशिक म. न. पा. मधून पुणे येथे निवड झाली. त्यानंतर मनाशी ठरवले कि मनपा क्षेत्रीय सर्व महिलांना तंत्रस्नेही प्रशिक्षण देऊन तंत्रज्ञानात साक्षर करायचे. या कमी मला पूर्ण पाठिंबा व प्रोत्साहन मनपा विभाग शिक्षणाधिकारी मा. श्री . नितीन उपासनी साहेब यांनी दिले.
मी व माझी टीम -(श्रीम. मनीषा बिडवे, श्रीम. अनिता शिराळे, श्रीम. अनिता पाटोळे ) आम्ही जिल्हास्तरावर महिला तंत्रस्नेही प्रशिक्षण दिले. नंतर तंत्रस्नेही प्रशिक्षण पूर्ण केले. त्यासाठी माझ्या टीम मधील मैत्रिणींनी मला पूर्ण साथ दिली.
आज तंत्रस्नेही शिक्षिका म्हणून नाशिक म. न. पा. मध्ये माझी स्वतःची एक ओळख निर्माण झाली आहे.
या कमी मला मदत करणारे म. न. पा. शिक्षण विभाग शिक्षणाधिकारी मा. श्री. नितीन उपासनी साहेब, म. न. पा. शिक्षण विभाग सर्व आदरणीय केंद्र प्रमुख माझ्या मुख्याध्यापिका सौ. कल्पना पाटील मॅडम, माझे पती श्री अनिल आहेर माझ्या सर्व तंत्रस्नेही मैत्रिणी व प्रत्येक तंत्रस्नेही प्रशिक्षणासाठी तत्पर मदत करणारे श्री. दीपक टिळे सर, श्री. पंकज गांगुर्डे सर, श्री. प्रल्हाद हंकारे सर व श्री. जयंत शिंदे सर, सर्व. ज्ञात -अज्ञात शिक्षक बंधू भगिनी... आपणा सर्वांची मी खूप ऋणी आहे. व सदैव ऋणी राहीन ....
अशीच साथ यापुढेही राहू द्या हि विनंती ...