➽➽➽➽➽➽➽➽➽ विभक्ती व सामान्यरूप ➽➽➽➽➽➽➽➽➽
💀💀 विभक्ती -: नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात ,त्या विकारांना विभक्ती म्हणतात .विभक्ती दर्शविणाऱ्या अक्षरांना विभक्ती प्रत्यय असे म्हणतात .
विभक्ती एकवचनी प्रत्यय अनेकवचनी प्रत्यय मुख्य अर्थ
प्रथमा प्रत्यय नाहीत प्रत्यय नाहीत कर्ता
द्वितीया स,ला,ते स ,ला,ना,ते कर्म
तृतीया ने,ए,शी नी ,ही ,ई,शी करण
चतुर्थी स ,ला,ते स ,ला,ना ,ते संप्रदान
पंचमी ऊन ,हून ऊन,हून अपादान
षष्ठी चा ,ची ,चे चे ,च्या ची संबंध
सप्तमी त, ई, आ त ,ई ,आ अधिकरण
संबोधन प्रत्यय नाहीत नो हक मारणे
💀💀 सामान्यरूप :- एखाद्या शब्दाला विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागताना त्या शब्दाचे मूळ रूप बदलते .या बदललेल्या रुपाला त्या शब्दाचे सामान्यरूप असे म्हणतात .उदा .वाडा-वाड्याचे ,झाड -झाडाचे
No comments:
Post a Comment