⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭ वचन व वचनाचे प्रकार ⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭
⬉⬉⬉⬉ वचन:- नामावरून वस्तू एक आहे कि अनेक आहेत, याचा बोध होणे म्हणजेच त्या नामाचे वचन होय ......
⬉⬉⬉ मराठीत नामाचे दोन वचने आहेत :-१) एकवचन २)अनेकवचन (बहुवचन )
१) एकवचन : नामाच्या रूपावरून जेव्हा एका वस्तूचा बोध होतो ,तेव्हा त्याचे एकवचन मानले जाते ....
उदा. घोडा ,नदी ,पुस्तक ,घर ,वीट ,देव ,पक्षी ,माळ ,गोष्ट इत्यादी
२) अनेकवचन (बहुवचन ) : नामाच्या रूपावरून जेव्हा एकपेक्षा अधिक वस्तूचा बोध होतो ,तेव्हा त्याचे अनेकवचन मानले जाते ....
उदा. घोडे ,नद्या ,पुस्तके ,घरे ,विटा,देव ,पक्षी , माला , गोष्टी इत्यादी
केव्हा केव्हा व्यक्ती एक असूनही वयाने , अधिकाराने थोर असते ,त्या व्यक्ती बद्दल आधार दाखवण्यासाठी आपण त्या व्यक्तीचा उल्लेख अनेकवचनी करतो .याला आदरार्थी अनेकवचन असे म्हणतात .
उदा. १-गांधीजी अतिशय थोर मनाचे होते . २-बाबा उद्या येतील .
No comments:
Post a Comment