सहर्ष स्वागत

सविता बोरसे यांच्या शैक्षणिक उपक्रमशील ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे.

गणित .......सरासरी

                                    ⧪⧪⧪⧪⧪⧪⧪ सरासरी ⧪⧪⧪⧪⧪⧪⧪ 

१) सरासरी =दिलेल्या घटकांची बेरीज /एकूण घटकांची बेरीज  यावरून ,

दिलेल्या घटकांची बेरीज = एकूण घटक * त्यांची सरासरी 

२) तीन ,पाच ,सात क्रमवार संख्याची सरासरी तसेच क्रमवार सम व विषम संख्याची सरासरी ही त्या संख्याच्या माडली संख्या असते .उदा .११ ,१३,१५,१७,१९,२१,२३ या सात क्रमवार संख्याची सरासरी १७ आहे .

३) दोन ,चार ,सहा ,आठ क्रमवार संख्याची सरासरी सम वा विषम संख्यांची सरासरी ही त्या संख्याच्या मधोमध येणाऱ्या दोन संख्याच्या मधली संख्या असते .

उदा. १४,१६,१८,२०,२२,२४,२६,२८या आठ क्रमवार संख्याची सरासरी २० व २२ याच्या मधोमध येणाऱ्या २१ ही संख्या असते .

४) हाच नियम समान फरक असणाऱ्या संख्याच्या सरासरी साठी देखील लागू होतो ...

उदा . १३,२०,२७,३४,४१,४८,५५,६२ या संख्यांची सरासरी ३४ व ४१ यांच्या मधोमध येणारी संख्या ३७.५ ही आहे .

No comments:

Post a Comment