⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪ भारतातील प्रमुख नद्याविषयी माहिती ⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
⧭⧭ तापी नदी :- ही पश्चिम वाहिनी नदी आहे .तिचा उगम सातपुडा पर्वतात मलताईजवळ होतो . ती महाराष्ट्र, गुजरात राज्यातून वाहते आणि अरबी समुद्रास मिळते .पूर्ण ही तापी नदीची प्रमुख उपनदी आहे .
⧭⧭ गोदावरी नदी :-ही भारतीय पठारावरील सर्वात जास्त लांब अशी नदी आहे .गोदावरी नदी ही सह्यांद्रीमध्ये त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते .ही नदी महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश या राज्यातून वाहते व बंगालच्या उपसागराला मिळते .प्रवरा ,मांजरा,प्राणहिता , इंद्रावती या गोदावरीच्या उपनद्या आहेत .
⧭⧭ कृष्णा नदी :-ही नदी सह्यांद्री पर्वतातमहाबळेश्वर येथे उगम पावते .ही नदी महाराष्ट्र ,कर्नाटक आणि आंध्रप्रदेश येथून वाहते व बंगालच्या समुद्राला मिळते . भीमा ,तुंगभद्रा ,पंचगंगा या कृष्णेच्या मुख्य उपनद्या आहेत .
⧭⧭ गंगा नदी :- गंगा ही भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी आहे. या नदीचा उगम गंगोत्री या हिमनदीतून होतो .ही नदी उत्तराचल ,उत्तरप्रदेश व बिहार या राज्यातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते .
⧭⧭ सिंधू नदी :- भारतीय संस्कृतीचा उगम व विकास सिंधू नदीच्या काठीच झाला .ही नदी हिमालयात मन सरोवराजवळ उगम पावते.ती जम्मु आणि काश्मीर मधून वाहत जाऊन पाकिस्तानात प्रवेश करते व पुढे ती अरबी समुद्रास मिळते .
No comments:
Post a Comment