सहर्ष स्वागत

सविता बोरसे यांच्या शैक्षणिक उपक्रमशील ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे.

गणित .....मूळ व संयुक्त संख्या

⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪  मूळ व सयुंक्त संख्या   ⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪

⧭⧭ मूळ संख्या : 

१- ज्या संख्येचे १ व ती संख्या हे दोनच विभाजक असतात , त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. 

२- १ ते १००  मधील मूळ संख्या : २,३,५,७,११,१३,१७,१९,२३,२९,३१,३७,४१,४३,४७,५३,५७,५९,६१,६७,७१,७९,८३,८९,९७ ( एकूण २५  संख्या ) 

३- २ ही एकमेव सम संख्या व मूळ संख्या आहे .अन्य सर्व सम संख्या या संयुक्त संख्या आहेत .

⧭⧭ संयुक्त संख्या :१ पेक्षा मोठ्या ज्या मूळ संख्या नाहीत त्यांना संयुक्त संख्या म्हणतात. १ ही संख्या मूळ संख्या नाही व संयुक्त संख्या देखील नाही .१ ते १०० मध्ये ७४ संयुक्त संख्या आहेत .

⧭⧭ जोडमूळ  संख्या : दोनचा फरक असणाऱ्या मूळ संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात.१ ते १०० मधील ३व५ ,५व७ , ११व १३ , १७ व १९ ,२९ व३१ ,४१व ४३ , ५९ व ६१ , ७१व ७३ या ८ जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत .

⧭⧭सह्मूळ संख्या : ज्या दोन किंवा अधिक संख्यांना १ व्यतिरिक्त अन्य सामाईक विभाजक नसतो ,त्या सहमूळ संख्या होत .२५ व २८ , १२ व ३५


 

No comments:

Post a Comment