⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭ विभाज्यतेच्या कसोट्या ⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭
१ ) २ ,४ ,८ च्या कसोट्या :-
अ- संख्येच्या एककस्थानी जर ०,२,४,६,८ यापैकी एखादा अंक असल्यास त्या संख्येस २ ने नि:शेष भाग जातो .
आ-ज्या संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला ४ ने नि :शेष भाग जातो ,त्याचप्रमाणे ज्या संख्येमध्ये शेवटी दोन शून्य असतात ,अशा संख्येला ४ ने नि:शेष भाग जातो .
इ- ज्या संख्येतील एकक ,दशक ,शतक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला ८ ने नि:शेष भाग जातो . तसेच ज्या संख्येमध्ये शेवटी तीन शून्य असतात ,त्या संख्येला ८ ने नि: शेष भाग जातो .
२)३,६,९,१८ च्या कसोट्या :-
अ -ज्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला ३ ने नि :शेष भाग जातो त्या संख्येला ३ ने नि :शेष भाग जातो .
आ-ज्या सम संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला ३ ने नि :शेष भाग जातो , त्या संख्येला ६ ने नि:शेष भाग जातो .
इ- ज्या संख्येतील सर्व अंकाच्या बेरजेला ९ ने नि:शेष भाग जातो ,त्या संख्येला ९ ने नि:शेष भाग जातो .
ई-ज्या सम संख्येतील सर्व अंकाच्या बेरजेला ९ ने नि :शेष भाग जातो ,त्या संख्येला १८ ने नि:शेष भाग जातो.
३) ५ व १० च्या कसोट्या :-
अ -ज्या संख्येच्या एककस्थानी ५ किंवा ० यापैकी एखादा अंक असेल ,त्या संख्येला ५ ने नि:शेष भाग जातो .
आ- ज्या संख्येच्या एककस्थानी ० हा अंक असतो ,त्य संख्येला १० ने नि :शेष भाग जातो .
४) ११ ची कसोटी :-
एखाद्या संख्येतील सम स्थानच्या अंकांची बेरीज व विषम स्थानच्या अंकांची बेरीज यांमधील फरक ० अथवा ११ च्या पटीत असल्यास , त्या संख्येस ११ ने नि:शेष भाग जातो .
५) पदावली सोडविताना कंस ,चे भागाकार ,गुणाकार ,बेरीज व वजाबाकी या क्रमानी क्रिया कराव्यात . या क्रिया डावीकडून उजवीकडे अशा क्रमाने करतात ..
No comments:
Post a Comment