सहर्ष स्वागत

सविता बोरसे यांच्या शैक्षणिक उपक्रमशील ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे.

गणित ......सम व विषम संख्या

⭅⭅⭅⭅⭅⭅  सम व विषम संख्या ⭅⭅⭅⭅⭅⭅⭅ 

१-ज्या संखेला २ ने पूर्ण भाग जातो ,अशा संख्येला सम संख्या असे म्हणतात .सम संख्येचा २ हा अवयव असतो . सम संख्येच्या एककस्थानी २,४,६,८,०  यापैकी कोणताही एक अंक असतो .

२-ज्या संख्येला २ ने पूर्ण भाग जात नाही , अशा संख्येला विषम संख्या असे म्हणतात . विषम संख्येच्या एककस्थानी १,३,५,७,९ यापैकी कोणताही एक अंक असतो .

३-क्रमवार संख्या एकेकाने वाढत जातात .उदा .७,८,९,१० ............किंवा ४५,४६,४७,४८,......

क्रमवार सम संख्या दोन - दोनने वाढत जातात. उदा. १२,१४,१६,१८,२०,२२,२४,२६...........

क्रमवार विषम संख्या ही दोन - दोनने वाढत जातात .उदा. १३,१५,१७,१९,२१,२३,२५.........

४- दोन सम संख्याची बेरीज सम संख्याच असते . जसे ६+ ४ = १० 

दोन सम संख्याच गुणाकार सम संख्याच असतो . जसे ४*६ =२४ 

दोन विषम संख्यांची बेरीज सम संख्याच असते.  ११+१७ =२८ 

दोन विषम संख्याच गुणाकार मात्र विषम संख्या असतो .  ११ * ९ = ९९

No comments:

Post a Comment