सहर्ष स्वागत

सविता बोरसे यांच्या शैक्षणिक उपक्रमशील ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे.

व्याकरण- स्कालरशिप अभ्यास (संधी)

                         ⧪⧪⧪⧪⧪⧪ संधी  ⧪⧪⧪⧪⧪⧪ 

संधी=एकापाठोपाठ एक आलेले दोन वर्ण एकत्र होण्याच्या प्रकाराला संधी असे म्हणतात.

उदा.सूर्ये +अस्त = सूर्यास्त 

संधीचे तीन प्रकार आहेत ......१) स्वर् संधी २) व्यंजन संधी  ३) विसर्ग संधी 

१) स्वर संधी = जेव्हा एकापाठोपाठ येणारे दोन स्वर एकत्र  मिळतात; तेव्हा त्या संधीलास्वर संधी असे म्हणतात.( स्वर + स्वर ) उदा .सूर  + ईश  =सुरेश 

२)व्यंजन संधी =एकापाठोपाठ येणाऱ्या दोन वर्णापैकीपहिला वर्ण हा जेव्हा व्यंजन असतो व दुसरा वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असतो ,तेव्हा त्या संधीला व्यंजन संधी असे म्हणतात.(व्यंजन +स्वर किंवा व्यंजन ) उदा. सत+आचार =सदाचार;उत+लंघन=उल्लंघन

३)विसर्ग संधी =एकापाठोपाठ येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा जेव्हा विसर्ग असतो व दुसरा वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असतो ,तेव्हा त्या संधी ला विसर्ग संधी असे म्हणतात . (विसर्ग +स्वर किंवा व्यंजन ) उदा . नि:+आधार =निराधार  ,दु : +काळ =दुष्काळ 

स्वर संधी = हिम +आलय =हिमालय 

गुरु +उपदेश =गुरुपदेश   

व्यंजन संधी =तत +लीन =तल्लीन 

विद्युत +लता =विध्युल्लता

विसर्ग संधी =अध :+ वदन  =अधोवदन

दु :+आत्मा =दुरात्मा 

नि:+चल=निश्चल


 

 

 

 

 

 


No comments:

Post a Comment