सहर्ष स्वागत

सविता बोरसे यांच्या शैक्षणिक उपक्रमशील ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे.

गणित ......बेरीज

⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭   बेरीज    ⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭ 

१- बेरीज करावयाच्या संख्या बिनचूक लिहा.

२- बेरीज उभ्या मांडणीने करायची झाल्यास संख्यांमधील एकक,दशक,शतक ,हजार  स्थानाचे अंक बरोबर एकाखाली एक लिहावे .

३-आडव्या मांडणीतील संख्यांची बेरीज करण्याचा सराव करावा .त्यामुळे बेरीज  झटपट करता येते .

४ - दोन अंकांची बेरीज ते अंक समजताच करता आली पाहिजे .

५ - बेरजेचे एक उदा.पाहूया ...४ +५ +९ +७ =?

***बेरीज करण्याची चुकीची रीत : ४ आणि ५ नऊ.९ आणि ९ अठरा . १८ आणि ७ पंचवीस 

ही रीत बेरीज करण्याच्या क्रियेत अडथळा निर्माण करीत असल्याने योग्य नाही . 

***बेरीज करण्याची योग्य रीत : ९,१८,२५ .

संख्या नजरेने दिसत असता त्यांचा उच्चार करण्याची गरज नसते .तसेच बेरीज करायची हे ठरलेले असताना 'आणि 'म्हणण्याची जरुरी नसते .बेरीज योग्य प्रकारे करण्याचा सराव केल्यास आपला भरपूर वेल वाचतो.




No comments:

Post a Comment