सहर्ष स्वागत

सविता बोरसे यांच्या शैक्षणिक उपक्रमशील ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे.

गणित .....कालमापन

                                    ⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭ कालमापन ⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭ 

१) तास - मिनिटे :- तास व मिनिटे ही कालमापनाची एकके आहेत .१ तास =६० मिनिटे ,अर्धा तास =३० मिनिटे , पाव तास =१५ मिनिटे , पाऊण तास =४५ मिनिटे 

२) १२ ताशी कालमापन :- तास व मिनिटे दाखवणाऱ्या संख्याची बेरीज करताना मिनिटांची बेरीज ६० पेक्षा जेव्हा जास्त होते ,तेव्हा त्या मिनिटांचे तास व मिनिटे अशी विभागणी करून बेरजेत आलेल्या तासांत मिळवतात ....

 जसे -४ ता. ५०मि.+ ३ ता .२५ मि.=७ ता . ७५ मि.

                                               =७ ता. + ७५ मि. 

                                          =   ७ ता .+ १ ता . १५ मि. =८ तास १५ मिनिटे 

३- दुपारचे १२ वाजले म्हणजे माध्यान्ह झाली असे म्हणतात .दुपारी १२ वाजल्यानंतरचा काळ ,म्हणजे माध्यान्होत्तर काळ व दुपारी १२ वाजण्याच्या आधीचा काळ ,म्हणजे मध्यान्ह पूर्व काळ असे म्हणतात...

४- वेळ सांगण्याचा वेगवेगळ्या पध्दती :  १२ :५० = १२ वाजून ५० मिनिटे किंवा १ वाजायला १० मिनिटे कमी ..

४:३० = ४ वाजून ३० मिनिटे किंवा साडेचार 

२ :१५ =२ वाजून १५ मिनिटे  किंवा सव्वादोन 

५:४५ =५ वाजून ४५ मिनिटे किंवा पावणेसहा

 

  

No comments:

Post a Comment