सहर्ष स्वागत

सविता बोरसे यांच्या शैक्षणिक उपक्रमशील ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे.

गणित ......सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या तयार करणे .

⧭⧭⧭⧭⧭⧭⧭ सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या तयार करणे ⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭

१) दिलेले अंक एकेकदाच वापरून सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या तयार करणे :- सर्वात लहान संख्या तयार करताना दिलेले अंक डावीकडून उजवीकडे चढत्या क्रमाने लिहिले असता  ( ० हा अंक वगळून ) त्या अंकांपासून बनणारी सर्वात लहान संख्या मिळते . उदा . ५,७,१,४ या अंकांपासून १४५७ ही सर्वात लहान संख्या बनते .व उतरत्या क्रमाने लिहिल्यास सर्वात मोठी संख्या मिळते . ७५४१   ही मोठी संख्या तयार होते . 

दिलेल्या अंकांमध्ये ० हा अंक असल्यास ,तो डावीकडून दुसऱ्या स्थानी लिहावा .उदा .७,८,५,० या अंकापासून ५०७८  ही सर्वात लहान संख्या तयार होते , व मोठी संख्या तयार करताना ऑ हा अंक शेवटी लिहावा . ८७५० ही मोठी संख्या तयार होईल .

२) तीन अंक दिले असता चार किंवा पाच अंकी सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या तयार करणे :- तीन अंक दिले असता चार किंवा पाच अंकी सर्वात लहान संख्या तयार करताना ,सर्वात लहान अंक पुन्हापुन्हा वापरावा .उदा . ३,१,७ या अंकापासून मिळणारी चार अंकी  सर्वात लहान संख्या =१,१३७ व पाच अंकी सर्वात लहान संख्या =११,१३७ 

दिलेल्या अंकामध्ये ० आल्यास तो डावीकडून पहिल्या अंकानंतर जास्तीत जास्त वेळा घ्यावा .उदा .८,०,५ या अंकापासून चार व पाच अंकी लहानात लहान संख्या = ५,००८, ५०,००८  व मोठी संख्या तयार करताना मोठा अंक जास्तीत जास्त वेळा घ्यावा .उदा. ९,७,८ या अंकापासून चार अंकी मोठी संख्या ९,९८७  व पाच अंकी मोठी संख्या ९९ ,९८७ .

No comments:

Post a Comment