सहर्ष स्वागत

सविता बोरसे यांच्या शैक्षणिक उपक्रमशील ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे.

व्याकरण-भाषा ....शिष्यवृत्ती परीक्षा .......शब्दाच्या जाती

                                  ➤➤➤➤➤➤ शब्दाच्या जाती ➤➤➤➤➤➤ 
शब्दाच्या जाती ८ आहेत ........१)नाम  ३)सर्वनाम  ३) विशेषण  ४)क्रियापद ५) क्रियाविशेषण अव्यय  ६)शब्दयोगी अव्यय  ७) उभयान्वयी अव्यय ८)केवलप्रयोगी  अव्यय  .....

१) नाम -प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा कल्पित वस्तूचे किंवा तिच्या गुणधर्माचे नाव दर्शवनाऱ्याविकारी शब्दाला नाम म्हणतात .उदा.झाड ,महेश ,गाय ,अमृत ,आनंद .घर ,शाळा,हिमालय ,गंगा ,चांगुलपना ,गुलामगिरी इ.
नामाचे प्रकार - १-सामान्यनाम २-विशेषनाम ३-भाववाचक नाम 
२)सर्वनाम -नामाएवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात ...उदा. मी,तो,तू,ती,हा 
सर्वनामाचे प्रकार -१-पुरुषवाचक २-दर्शक ३-संबंधी ४-प्रश्नार्थक ५-सामान्य ६-आत्मवाचक सर्वनाम  
३-विशेषण -नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण म्हणतात . उदा. चागला, वाईट,शूर ,धीट ,पांढरा,पुष्कळ ,दहा,थोडा इ.
विशेषणाचे प्रकार -१-गुणविशेषण २-संख्या ३-सार्वनामिक ४धातुसाधित ५-विधीविशेषण 
४)क्रियापद -क्रियेचा बोध करून वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या विकारी शब्दाला क्रियापद असे म्हणतात ..उदा. लिहितो ,बोलतात ,गेला,पहिले इ.
क्रियापदाचे प्रकार -१-सकर्मक २-अकर्मक ३-संयुक्त ४-प्रयोजक ५-शक्य ..
५)क्रियाविशेषण अव्यय -क्रियेविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात ..उदा.तेथे ,तिकडे ,नंतर ,अगोदर ,पटपट ,पुष्कळ इ.
क्रीयाविशेषणाचे प्रकार -१-स्थलवाचक २-कालवाचक ३-रीतिवाचक ४ -परिणामवाचक क्रियाविशेषण 
६)शब्दयोगी अव्यय -जो शब्द वाक्यातील एखाद्या शब्दाला जोडून येतो,त्या शब्दाचा त्याचा वाक्यातील दुसर्या एखाद्या शब्दाशी संबंध दर्शिवतो त्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.
७)उभयान्वयी अव्यय -दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात..उदा. आणि ,व ,शिवाय,परंतु ,म्हणून ,अथवा ,पण,किंवा ,वा .म्हणून इ.
८)केवलप्रयोगी अव्यय -आनंद ,दु :ख ,तिरस्कार ,आश्चर्ये  इत्यादी भावना अचानकपणे उद्गारातून व्यक्त करणाऱ्या अविकारी शब्दाला केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात ....उदा. वाहवा ,शाब्बास ,व्वा ,ओहो ,अबब ,अंग बाई ,अरे बापरे ,अरेरे,हाय हाय ,इश्श इ.



No comments:

Post a Comment