सहर्ष स्वागत

सविता बोरसे यांच्या शैक्षणिक उपक्रमशील ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे.

गणित ......५ अंकापयेंतच्या संख्यांचे वाचन व लेखन

➽➽➽➽   पाच  अंकांपर्येंतच्या  संख्यांचे  वाचन व लेखन  ➽➽➽➽➽ 

१) ३९,२४८ ही संख्या एकोणचाळीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस अशी वाचतात .

म्हणजेच , वाचताना दशहजार व हजार ही स्थाने एकत्र घेतात व नंतर उरलेली तीन अंकी संख्या घेतात .

२) संख्या जेव्हा चार किंवा पाच अंकी असतात ,तेव्हा अशा संख्यांचे वचन किंवा लेखन अचूक व्हावे ,यासाठी काळजी घ्यावी लागते .

अ) संख्याचे वचन नीट व्हावे यासाठी स्वल्पविराम घालून संख्येतील अंकांचे गट पाडतात.उदा .जसे : ७१,४८३  व ४५,७९० 

ब ) स्वल्पविराम देण्याची कृती पुढीलप्रमाणे करावी : प्रथम उजवीकडून डावीकडे पहिले तीन अंक ( म्हणजेच शतकस्थानापर्येंतचे  ) सोडून स्वल्पविराम द्यावा ,तद्नंतर दोन-दोनच्या गटाने डावीकडे स्वल्पविराम देत जावे .उदा . जसे : ३,४०७  ,  ४२,०५१  ,३३,२३५ 

क ) १० एकक = १ दशक  ,   १० दशक = १ शतक 

  १० शतक = १ हजार  ,  १० हजार - १ दशहजार 

No comments:

Post a Comment