सहर्ष स्वागत

सविता बोरसे यांच्या शैक्षणिक उपक्रमशील ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे.

व्याकरण ( काळ ) शिष्यवृत्ती परीक्षा

                        ➤➤➤➤➤➤➤➤➤ व्याकरण -काळ  ➤➤➤➤➤➤➤➤➤➤ 

⧪⧪ काळ := क्रियापदाच्या रूपावरून क्रिया कोणत्या वेळी घडते आहे याचा जो बोध होतो , त्यास काळ असे म्हणतात .  

⧭⧭  काळाचे प्रकार व पोटप्रकार := मुख्य काळ तीन आहेत .  

१) वर्तमानकाळ : या काळात क्रिया घडते असा बोध होतो .उदा. ती  धावते . 

२)भूतकाळ : या काळात क्रिया पूर्वी घडली आहे असा बोध होतो . उदा.ती धावली . 

३) भविष्यकाळ : या काळात क्रिया पुडे घडेल असा बोध होतो .उदा.ती धावेल .

⧭⧭ काळाचे चार पोटप्रकार आहेत :१-साधा २-अपूर्ण ३-पूर्ण ४-रीती  

तिन्ही काळातील सर्व प्रकारातील क्रियापदाची रूपे ..........

१-साधा वर्तमान काळ -मी पुस्तक वाचतो .२-अपूर्ण वर्तमान काळ -मी पुस्तक वाचत आहे.  ३-पूर्ण वर्तमान काळ -मी पुस्तक वाचले आहे .४-रीती वर्तमान काळ -मी पुस्तक वाचत असतो .

१-साधा भूतकाळ -मी पुस्तक वाचले.  2 -अपूर्ण भूतकाळ -मी पुस्तक वाचत होतो .            ३-पूर्ण भूतकाळ -मी पुस्तक वाचले होते.४- रीती भूतकाळ -मी पुस्तक वाचत असे .

१-साधा भविष्यकाळ -मी पुस्तक वाचेन .२-अपूर्ण भविष्यकाळ -मी पुस्तक वाचत असेल .   ३- पूर्ण भविष्यकाळ -मी पुस्तक वाचले असेन .४-रीती भविष्यकाळ -मी पुस्तक वाचत जाईन.

No comments:

Post a Comment