सहर्ष स्वागत

सविता बोरसे यांच्या शैक्षणिक उपक्रमशील ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे.

गणित .... संख्यांचा .चढता व उतरता क्रम

⧭⧭⧭⧭⧭⧭⧭ संख्यांचाचढता व उतरता क्रम ⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭ 

१- संख्यांचा चढता व उतरता क्रम लावताना ,आपल्याला त्या संख्याची तुलना करावी लागते.

२-जर दिलेल्या संख्येत अंकांची संख्या समान असेल ,तर डावीकडून सुरवात करून अंकांची तुलना करावी .उदा .५६७८९ ,७६५८९ ,६५७८९ या संख्यामधील सर्वात डावीकडे असणारे अंक अनुक्रमे ५,७,६ आहेत. ७ > ६ > ५  आणि ५ <६ <७  यावरून ७६५८९ ही सर्वात मोठी संख्या आहे व ५६७८९ ही सर्वात लहान संख्या आहे . 

म्हणून , चढता क्रम : ५६७८९ ,६५७८९ ,७६५८९ .

आणि उतरता क्रम : ७६५८९ ,६५७८९ ,५६७८९ 

३-जर सर्वात डावीकडचा अंक तोच असेल, तर दुसऱ्या अंकाव्ही तुलना करावी .

उदा . २५६९८ ,२५८८९ ,२५६८९ ,२५९८६ यात डावीकडचे दोन अंक समान आहेत .म्हणून त्या पुढच्या अंकाची तुलना करू . पुढचे अंक ६ ,८ ६,९ असे आहेत .

६< ८ < ९ आणि ९ > ८ > ६ यावरून सर्वात मोठी संख्या =२५९८६ व सर्वात  लहान संख्या =२५६८९

No comments:

Post a Comment