➤➤➤➤➤➤➤➤➤➤ त्रिकोण व त्रिकोणाचे प्रकार ➤➤➤➤➤➤➤➤➤➤
➽ त्रिकोण :-तीन नैकरेषीय बिंदू रेषाखंडानी जोडून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण असे म्हणतात .
त्रिकोणाचे शिरोबिंदू ,बाजू व कोन यांना त्रिकोणाचे घटक असे म्हणतात .त्रिकोणाला ३ शिरोबिंदू ,३ बाजू व ३ कोन असतात .
➽➽ त्रिकोणाचे प्रकार :- कोनावरुन पडणारे प्रकार
१) लघुकोन त्रिकोण - ज्या त्रिकोणाचे तीनही कोन लघुकोन असतात ,त्या त्रिकोणाला लघुकोन त्रिकोण असे म्हणतात ....
२) काटकोन त्रिकोण - ज्या त्रिकोणाचा एक कोण काटकोन असतो ,त्या त्रिकोणास काटकोन त्रिकोण असे म्हणतात .
३)विशालकोन त्रिकोण - ज्या त्रिकोणाचा एक कोन विशालकोन असतो ,त्या त्रिकोणास विशालकोन त्रिकोण असे म्हणतात .
➽➽ बाजूवरुन पडणारे प्रकार
१)समभूज त्रिकोण -ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या असतात ,त्या त्रिकोणाला समभूज त्रिकोण असे म्हणतात.
२)समद्विभूज त्रिकोण -ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणाला समद्विभूज त्रिकोण असे म्हणतात.
३)विषमभूज त्रिकोण -ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू असमान लांबीच्या असतात , त्या त्रिकोणाला विषमभूज त्रिकोण असे म्हणतात.
No comments:
Post a Comment