⏩⏩⏩⏩ अंकांची स्थानिक किमंत व संख्यांचे विस्तारित रूप ⏩⏩⏩⏩⏩
⧭⧭⧭ स्थानिक किमंत :-
कोणत्याही संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किमंत त्या संख्येतील त्याच्या एकक,दशक,शतक ,हजार ,दशहजार ............अशा स्थानावरून ठरते .
उदा . ८३४६ या संख्येतील ३ ची स्थानिक किमंत ३०० ( ३ गुणिले १०० ) आहे .
२३,७६४ या संख्येतील ३ ची स्थानिक किमंत ३००० (३ गुणिले १००० ) आहे .
⧭⧭⧭ संख्यांचे विस्तारित रूप :-
८३,६४७ या संख्येंत ,
८ ची स्थानिक किमंत ८ दशहजार =८०,०००
३ ची स्थानिक किमंत ३ हजार = ३०००
६ ची स्थानिक किमंत ६ शतक =६००
४ ची स्थानिक किमंत ४ दशक =४०
७ ची स्थानिक किमंत ७ एकक =७
म्हणून ८०,००० +३,००० +६०० +४० +७ =८३,६४७
जर एका संख्येचे विस्तारित रूप ७०,००० +० +५०० +१० +९ असे असेल ,तर ती संख्या ७०,५१९ अशी असेल .
No comments:
Post a Comment