सहर्ष स्वागत

सविता बोरसे यांच्या शैक्षणिक उपक्रमशील ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे.

गणित .....मसावि ( महत्तम सामाईक विभाजक ) लसावि (लघुत्तम सामाईक विभाज्य )

                              ⧭⧭⧭⧭⧭⧭⧭ लसावि व मसावि ⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭ 

१) मसावि व लसावि काढण्याच्या दोन पध्दती : १- यादी पध्दती २- मूळ अवयव पध्दती 

२ ) दिलेल्या दोन संख्यांपैकी छोटी संख्या ,मोठ्या संख्येचा विभाजक असल्यास ,म्हणजेच मोठी संख्या छोट्या संख्येची विभाज्य संख्या असल्यास ,ती छोटी संख्या त्या संख्याचा मसावि,तर मोठी संख्या त्यांचा लसावि असते .

उदा. ६ व ३० संख्यामध्ये ६ ही संख्या ३० चा विभाजक आहे ,म्हणजेच ३० ही संख्या ६ ची विभाज्य संख्या आहे . म्हनुन६ व ३० या संख्याच मसावि ६ , तर लसावि ३० आहे .

३) दिलेल्या दोन संख्या सह्मुळ संख्या असतील ,तर त्याचा मसावि १ असतो व त्या दोन संख्येच्या गुणाकाराने मिळणारी संख्या ही त्यांचा लसावि असते . 

उदा . ५ व १२ या दोन संख्या सह्मुळ संख्या आहेत . म्हणून त्यांचा मसावि = १ 

व लसावि =५ * १२ =६० ही संख्या असते .


No comments:

Post a Comment