सहर्ष स्वागत

सविता बोरसे यांच्या शैक्षणिक उपक्रमशील ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे.

गणित ...मापन -वस्तुमान व धारकता

                         ⧪⧪⧪⧪⧪⧪ वस्तुमान व धारकता ⧪⧪⧪⧪⧪⧪ 

१) वस्तुमान :- किलोग्रॅम हे वस्तुमान मोजण्याचे प्रमाणित एकक आहे .१ किलोग्रॅम =१००० ग्रॅम .....२००० ग्रॅम  =२ किलोग्रॅम .....जेवढे किलोग्रॅम तेवढे हजार ग्रॅम आणि जेवढे हजार ग्रॅमतेवढे किलोग्रॅम असतात .

    पाव (१/४ ) किग्र =२५० ग्रम ,अर्धा ( १/२ ) किग्र =५०० ग्रम , पाऊण (३/४ ) किग्र =७५० ग्रम 

२) धारकता :- लिटर हे धारकता मोजण्याचे प्रमाणित एकक आहे .

१ लिटर = १००० मिलीलीटर , १००० मिली=१ लिटर 

जेवढे लिटर तेवढे हजार मिलीलीटर आणि जेवढे हजार मिलीलीटर तेवढे लिटर असतात .

पाव ली (१/४ ) ली =२५० मिली , अर्धा ली ( १/२ )ली =५०० मिली , पाऊण ली ( ३/४ ) ली =७५० मिली .

 

No comments:

Post a Comment