सहर्ष स्वागत

सविता बोरसे यांच्या शैक्षणिक उपक्रमशील ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे.

सामान्यज्ञान.....इतिहास

                                                     ⧭⧭ सामान्यज्ञान- इतिहास ⧭⧭ 

१)  इतिहासातील कालगणना :- भूतकाळात घडलेल्या घटनांचा परस्परसंबंध असतो ,या घटनांचा कालक्रम ठरविण्यासाठी काळ मोजण्याच्या पद्धतीला  'कालगणना ' असे म्हणतात .

२)' इसवी सन ' हा शब्द कसा तयार झाला ? 

- येशू ख्रिस्ताच्या जन्म वर्षापासून इसवी सनाची कालगणना सुरु झाली .येशु ख्रिस्ताना अरबी  भाषेत 'ईसा ' असे म्हणतात .ईसावरून 'इसवी 'असा शब्द तयार झाला .सन म्हणजे वर्ष किंवा साल .

३) इसवी सन व इसवी सन पूर्व म्हणजे काय ?

- येशू ख्रिस्ताच्या जन्मावर्षापासूनइसवी सनाची कालगणना करतात .येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर घडलेल्या घटनांची  कालगणना म्हणजे 'इसवी सन' होय .येशू ख्रिस्ताच्या जन्माआधी घडलेल्या घटनांची कालगणना म्हणजे 'इसवी सन पूर्व ' होय. 

४) इसवी सन ही कालगणना आज जगभर का वापरतात ?

-आंतरराष्टीय पातळीवर सर्व देशांना कालगणना करण्यासाठी सोयीचे व्हावे म्हणून ही कालगणना वापरतात . 

No comments:

Post a Comment