सहर्ष स्वागत

सविता बोरसे यांच्या शैक्षणिक उपक्रमशील ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे.

सामान्यज्ञान...भारतीय संस्कृती

                              ⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪ भारतीय संस्कृती  ⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪ 

१) चार वेद :-ऋग्वेद , यजुर्वेद ,सामवेद ,अथर्ववेद 

१) ऋग्वेद :-निसर्गातील विविध शक्तींना देवता मानून निसर्गाचे वर्णन काव्यमय केले आहे. ऋग्वेदातील  प्रत्येक कडव्यास ' ऋचा ' असे म्हणतात .ऋग्वेद हा आर्याचा आद्य ग्रंथ आहे .

२)यजुर्वेद :-हा यज्ञाविषयी  माहिती व त्यात वापरावयाची मंत्रे याची माहिती यजुर्वेदात आहे.

३)सामवेद :-ऋग्वेदातील काव्याचे तालासुरात गायन कसे करावे याचे मार्गदर्शन यात केले आहे. सामवेद हा भारतीय संगीताचा पाया मनाला जातो ,हा वेद सर्वात लहान आहे .

४) अथर्ववेद :-यात तत्त्वज्ञानाबरोबरच दैनंदिन जीवनातील अडचणी ,संकटे ,पीडा व दु:ख यावर उपाय सांगितले आहेत .

⧭ महाकाव्ये :-१-रामायण २-महाभारत 

⧭  चार वर्ण :-१-ब्राम्हण २-क्षत्रिय  ३-वैश्य ४-शुद्र 

⧭ चार आश्रम :-१-ब्रह्मचर्याश्रम २-गृहस्थाश्रम ३-वानप्रस्थाश्रम ४-संन्यासाश्रम 

No comments:

Post a Comment